ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची किंवा वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असा संदेश देत लातूरमध्ये भक्तांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली.
वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वामींच्या केंद्रात भक्तांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी सायबर वॉरियर अविष्कार कांबळे यांनी उपस्थित भक्तांना सायबर फसवणुकीचे विविध प्रकार आणि त्यापासून सुरक्षित राहण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी ऑनलाइन फसवणूक, बनावट फोन कॉल, ओटीपीची मागणी, संशयास्पद लिंक, बनावट संदेश तसेच सोशल मीडिया फसवणूक याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली. डिजिटल व्यवहार करताना कोणत्याही अनोळखी व्यक्तीस ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
संशयास्पद फोन कॉल, संदेश किंवा लिंक प्राप्त झाल्यास त्यावर तात्काळ विश्वास न ठेवता योग्य ती पडताळणी करावी, तसेच अनोळखी लिंकवर क्लिक करणे टाळावे, असा सल्लाही यावेळी देण्यात आला.
क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
“सतर्क राहा, सुरक्षित राहा; सायबर फसवणुकीला बळी पडू नका,” असा संदेश यावेळी भक्तांना देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
