जळगाव बसस्थानकावर सायबर सुरक्षेची जनजागृती; क्यूएचएफच्या योद्ध्यांकडून प्रवाशांना मार्गदर्शन

क्विक हिल फाउंडेशनच्या वतीने जळगाव बसस्थानकावर प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, यूपीआय, ओटीपी, बनावट लिंक आणि सोशल मीडिया फसवणुकीपासून बचावाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

जळगाव बसस्थानकावर सायबर सुरक्षा अभियानातून ‘सावधान रहा, सुरक्षित रहा’चा संदेश. तनिषा महाजन आणि तेजस्विनी पाटील यांनी प्रवाशांना डिजिटल सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ , जळगाव येथील विद्यार्थ्यांच्या सहभागाने क्विक हिल फाउंडेशन (क्यूएचएफच्या) तर्फे जळगाव बसस्थानक परिसरात सायबर सुरक्षा व ऑनलाइन फसवणुकीबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.

युपीआई ,ओटीपी आणि बनावट लिंकबाबत मार्गदर्शन करण्यात आले .

क्यूएचएफच्या प्रभावी उपक्रम अंतर्गत बसस्थानकावर उपस्थित प्रवासी, विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी बनावट लिंक, युपीआई , ओटीपी , बनावट फोन कॉल व लिंक, सोशल मीडिया फसवणूक तसेच विविध प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.
सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी ओटीपी , पिन, पासवर्ड , तसेच बँकिंगशी संबंधित गोपनीय माहिती कोणाशीही शेअर करू नये, अनोळखी व्यक्तींच्या फोन कॉलवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले.

 ‘सावधान रहा, सुरक्षित रहा’चा संदेश
डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या उपक्रमाला प्रवासी, नागरिक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या जनजागृती अभियानातून ‘सावधान रहा, सुरक्षित रहा’ हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.

क्यूएचएफच्या योद्ध्यांचा सक्रिय सहभाग
या उपक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, क्यूएचएफच्या योद्ध्या तनिषा महाजन आणि तेजस्विनी पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी ऑनलाइन फसवणुकीच्या विविध पद्धती समजावून सांगत डिजिटल व्यवहार करताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!