बाभळगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात सायबर सुरक्षा जनजागृती सत्र; अविष्कार कांबळे आणि नरेश पंडित यांनी प्रशिक्षणार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे मार्गदर्शन केले.
लातूर : समाजातील विविध घटकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची पोलीस प्रशिक्षण केंद्र, बाभळगाव, लातूर येथे दखल घेण्यात आली. प्रशिक्षण केंद्रात आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती सत्रादरम्यान सायबर वॉरिअर अविष्कार कांबळे यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी सायबर वॉरिअर नरेश पंडित हेही उपस्थित होते.
सायबर सुरक्षा विषयाची प्रभावी मांडणी तसेच सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यासाठी घेत असलेल्या पुढाकाराबद्दल पोलीस प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्यांनी अविष्कार कांबळे यांचे कौतुक केले. समाजातील विविध घटकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यासाठी ते करत असलेल्या कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
या सत्रादरम्यान पोलीस प्रशिक्षणार्थ्यांना सायबर गुन्ह्यांचे स्वरूप, ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, ओटीपी सुरक्षितता, सोशल मीडिया सुरक्षा आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांच्या बदलत्या पद्धतींबाबत जागरूक राहणे आणि डिजिटल साधनांचा जबाबदारीने वापर करणे किती महत्त्वाचे आहे, यावरही यावेळी भर देण्यात आला.
या उपक्रमादरम्यान मिळालेल्या प्रोत्साहनामुळे सायबर जनजागृतीचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास प्रेरणा मिळाल्याचे अविष्कार कांबळे यांनी सांगितले. समाजात डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता वाढविण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित झाले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
