महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सायबर सजगतेचा जागर; २०० हून अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लातूर येथील आजीम महाविद्यालयात २०० हून अधिक विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. योगिता जाधव आणि प्राजक्ता बोरूळे यांनी ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, सोशल मीडिया आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा जनजागृती सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारत डिजिटल सुरक्षेबाबत सक्रिय सहभाग नोंदवला.

वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आजीम महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष सायबर सुरक्षा जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात २०० हून अधिक विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी सायबर वॉरियर योगिता जाधव आणि सायबर वॉरियर प्राजक्ता बोरूळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत ऑनलाइन फसवणूक, संशयास्पद लिंक, अनोळखी फोन कॉल व संदेश, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, वैयक्तिक माहितीची सुरक्षितता तसेच डिजिटल व्यवहार करताना आवश्यक असलेली खबरदारी याबाबत सविस्तर माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, संशयास्पद ऑनलाइन संपर्क कसा ओळखावा आणि सायबर फसवणुकीपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ओटीपी, पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती अनोळखी व्यक्तींशी शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.

यावेळी महाविद्यालयाचे डॉ. सरफराज सर उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदवला.

डिजिटल माध्यमांचा सुरक्षित, सजग आणि जबाबदारीने वापर करण्याचा संदेश या सत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!