श्री गुजराती इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचा सायबर सुरक्षा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती.
श्री गुजराती इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. क्विक हील फाउंडेशनच्या वतीने आयोजित या उपक्रमात राजर्षी शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना डिजिटल जगतात सुरक्षित राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
या सत्रामध्ये लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून सायबर फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यासोबतच सोशल मीडिया वापरताना कोणती काळजी घ्यावी, अनोळखी लिंकवर क्लिक करणे का टाळावे, वैयक्तिक माहिती शेअर न करणे, मजबूत पासवर्डचा वापर करणे आणि ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहणे, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
या मार्गदर्शन सत्रात साहिल जाधव, नम्रता तोर, नेहल बुलानी आणि परमेश्वर पांढरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर कसा करावा, तसेच विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत विविध उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी लाईव्ह डेमो आणि मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी सोप्या पद्धतीने उत्तरे देत डिजिटल सुरक्षिततेबाबत आवश्यक खबरदारी स्पष्ट केली.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
