सायबर सुरक्षित गाव आणि डिजिटल सुरक्षित समाजासाठी शिडोळ येथे जनजागृती; साहिल जाधव यांनी विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सायबर सुरक्षेचे धडे दिले.
शिडोळ गावातील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या निमित्ताने ‘आउटडोर मास ॲक्टिव्हिटी’ अंतर्गत सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष निलंगेकर यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमात क्विक हील फाउंडेशनच्या वतीने साहिल जाधव यांनी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना सायबर सुरक्षेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फसवणूक, अनोळखी लिंक, समाजमाध्यमांचा सुरक्षित वापर आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थितांना माहिती देण्यात आली.
मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दैनंदिन जीवनात डिजिटल साधनांचा वाढता वापर लक्षात घेता, प्रत्येकाने सायबर फसवणुकीच्या विविध प्रकारांबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी जयश्री जटाळ मॅडम, श्रद्धा जाधव मॅडम, विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकवृंद उपस्थित होते. गावचे सरपंच धुमाळ यांनीही कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थी व ग्रामस्थांना सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले.
प्राचार्यांसह उपस्थित मान्यवरांनी साहिल जाधव यांच्या सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, गावातील नागरिक, पालक, विद्यार्थी आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सायबर सुरक्षित गाव आणि डिजिटल सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांची सातत्याने गरज आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
