क्विक हील फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाला निलंग्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; नगराध्यक्ष, नगरसेवक आणि सरपंचांची मोठी उपस्थिती.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा येथील भाजपा संपर्क कार्यालयात क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सायबर सुरक्षा तज्ज्ञ साहिल जाधव यांनी उपस्थितांना विविध प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास निलंग्याचे नगराध्यक्ष संजय हळगरकर, २५ नगरसेवक तसेच निलंगा तालुक्यातील विविध गावांमधील १० सरपंच उपस्थित होते. यावेळी ऑनलाइन फसवणूक, ओटीपी स्कॅम, फिशिंग लिंक, सोशल मीडिया सुरक्षितता, बनावट कॉल आणि डिजिटल व्यवहारातील खबरदारी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणासोबतही शेअर न करणे तसेच ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक दक्षता घेणे महत्त्वाचे असल्याचे साहिल जाधव यांनी सांगितले.
नगराध्यक्ष संजय हळगरकर, नगरसेवक आणि सरपंचांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचविण्यासाठी अशा जनजागृती उपक्रमांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.
आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शन व सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम पार पडला. डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांनी सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी सतर्कता आणि डिजिटल साक्षरता वाढविण्याची गरज असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
