लातूरमध्ये पालकांना डिजिटल सुरक्षिततेचे धडे; लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे सायबर धोक्यांची माहिती देत परमेश्वर पांढरे यांनी पालकांशी संवाद साधला.
भारत विकास परिषदेत आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात परमेश्वर पांढरे यांनी उपस्थित पालकांना डिजिटल सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या श्री. कुलकर्णी यांच्या हस्ते परमेश्वर पांढरे यांचा सत्कार करून त्यांच्या सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी परमेश्वर पांढरे यांनी पालकांनी आपल्या मुलांच्या डिजिटल वापरावर जबाबदारीने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोबाईल, सोशल मीडिया आणि इंटरनेटचा वापर करताना मुलांनी कोणती काळजी घ्यावी, ऑनलाइन फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून सायबर धोके प्रत्यक्ष समजावून सांगत त्यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला. डिजिटल माध्यमांचा वापर करताना वैयक्तिक माहिती, संकेतशब्द, ओटीपी आणि इतर संवेदनशील माहिती सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व यावेळी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान परमेश्वर पांढरे यांच्या सायबर सुरक्षा जनजागृतीच्या कार्याचे श्री. कुलकर्णी यांनी कौतुक केले. त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील सामाजिक जनजागृतीच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास जयश्री जटाळ मॅडम तसेच राजश्री शाळा विद्यालयाच्या कोऑर्डिनेटर टीचर यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
सायबर सुरक्षेबाबत देण्यात आलेल्या मार्गदर्शनाला पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मुलांच्या सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी पालकांनी स्वतः सायबर सुरक्षेबाबत जागरूक राहून मुलांशी सातत्याने संवाद साधणे आवश्यक असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
