क्विक हील फाउंडेशनच्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमांतर्गत लातूरमध्ये कायदेशीर आणि तांत्रिक माहितीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यावर चर्चा झाली.
क्विक हील फाउंडेशनच्या वतीने प्राजक्ता आणि योगिता यांच्या संपूर्ण टीमने ॲडव्होकेट अजिंक्य निकम यांच्यासोबत सायबर सुरक्षेबाबत विशेष संवाद साधला. या संवादादरम्यान सध्या समोर येत असलेल्या विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यांवर तसेच त्यामागील कारणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी ऑनलाइन फसवणूक, ऑनलाइन ब्लॅकमेलिंग, डीपफेक आणि फोटो मॉर्फिंग यांसारख्या प्रकारांमुळे नागरिकांसमोर निर्माण होणाऱ्या समस्या तसेच अशा घटनांशी संबंधित प्रकरणांबाबत ॲडव्होकेट अजिंक्य निकम यांच्याकडून माहिती जाणून घेण्यात आली.
सायबर गुन्ह्यांशी संबंधित काही प्रकरणांचा अभ्यास करून त्यातील घटनाक्रम, नागरिकांना होणारा त्रास आणि अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर पातळीवर कोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरतात, याबाबतही संवाद साधण्यात आला. प्रत्यक्ष प्रकरणांच्या अभ्यासातून सायबर गुन्ह्यांची व्याप्ती तसेच त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या डिजिटल साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाची माहितीही टीमने ॲडव्होकेट अजिंक्य निकम यांना दिली. या संवादातून सायबर गुन्ह्यांविषयी प्रभावी जनजागृती करण्यासाठी कायदेशीर आणि तांत्रिक माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
या संवादावेळी परमेश्वर पांढरे, साहिल जाधव, नेहल बुलानी आणि नम्रता तोर यांच्यासह प्राजक्ता व योगिता यांच्या टीमची उपस्थिती होती. सायबर सुरक्षा, डिजिटल साक्षरता आणि कायदेशीर जागरूकतेच्या माध्यमातून नागरिकांना सुरक्षित डिजिटल वापराबाबत माहिती देण्याचा संदेश या संवादातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
