खेळातून सायबर सुरक्षेचे धडे; विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षिततेचा संदेश; डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलमध्ये ‘Yes or No – Digital Safety’ उपक्रम

लातूर येथील डॉ. झाकीर हुसेन हायस्कूलमध्ये ‘Yes or No – Digital Safety’ या अभिनव खेळातून विद्यार्थ्यांना लोकेशन ॲक्सेस, ॲप सुरक्षा, प्रायव्हसी आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि असुरक्षित डिजिटल पर्याय ओळखण्याचे प्रशिक्षण देत सजग आणि जबाबदार डिजिटल वापराचा संदेश देण्यात आला.

 डॉ. झाकीर हुसेन हायस्कूल, लातूर येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आयान, सोहम, जाधव साहिल आणि परमेश्वर पांडरे यांनी अनोख्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे महत्त्व समजावून सांगितले.

यावेळी ‘Yes or No – Digital Safety’ या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोर विविध डिजिटल परिस्थिती मांडण्यात आल्या. त्यामध्ये सुरक्षित आणि असुरक्षित पर्याय ओळखण्यास विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सायबर सुरक्षेचे नियम मनोरंजक पद्धतीने समजून घेतले.

विद्यार्थ्यांना मोबाईलमधील कोणत्याही ॲपला अनावश्यक लोकेशन ॲक्सेस देऊ नये, तसेच कोणतेही ॲप डाउनलोड करण्यापूर्वी त्याच्या Terms & Conditions आणि Privacy Policy वाचणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले. वैयक्तिक माहिती, फोटो, लोकेशन तसेच इतर संवेदनशील माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा ॲपसोबत विचार न करता शेअर करू नये, असा महत्त्वपूर्ण संदेशही देण्यात आला.

“वाचाल तर शिकाल, आणि शिकाल तर डिजिटल जगात सुरक्षित राहाल,” या संदेशातून विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. आजच्या डिजिटल युगात तंत्रज्ञानाचा वापर करताना सजग राहणे आणि स्वतःचे डिजिटल संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.

हा उपक्रम क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थ्यांच्या सहभागातून घेण्यात आला. या अभिनव उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!