सरस्वती महाविद्यालयात सायबर सुरक्षेचे धडे; लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे विद्यार्थ्यांना डिजिटल सुरक्षेचे मार्गदर्शन

नागपूर येथील सरस्वती महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती सत्र घेण्यात आले. लाईव्ह हॅकिंग डेमोद्वारे विद्यार्थ्यांना सायबर हल्ले, फिशिंग, ओटीपी, सोशल मीडिया सुरक्षा आणि सुरक्षित डिजिटल वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सरस्वती महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मजबूत पासवर्ड, फिशिंग लिंक, ओटीपी आणि सुरक्षित सोशल मीडिया वापराबाबत मार्गदर्शन करून डिजिटल जगतात जबाबदारीने वावरण्याचा संदेश देण्यात आला.

सरस्वती महाविद्यालय, नागपूर येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात आयान, सोहम, जाधव साहिल आणि परमेश्वर पांडरे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून सायबर हल्ले कोणत्या पद्धतीने होऊ शकतात, याची प्रात्यक्षिकांसह माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच डिजिटल युगात स्वतःचे संरक्षण कसे करावे, मजबूत पासवर्डचे महत्त्व, गोपनीयता, फिशिंग लिंक, ओटीपी आणि वैयक्तिक माहितीची सुरक्षितता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

विशेषतः स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर कसा करावा, लोकेशन शेअरिंग करताना कोणती खबरदारी घ्यावी, प्रायव्हसी सेटिंग्जचा योग्य वापर कसा करावा तसेच अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संवाद साधताना कोणती काळजी घ्यावी, याचेही प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.

Gen Z च्या डिजिटल युगात केवळ तंत्रज्ञानाचा वापर न करता त्याचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करणे ही काळाची गरज आहे, असा संदेश या सत्रातून विद्यार्थ्यांना देण्यात आला. लाईव्ह डेमोमुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आणि सायबर सुरक्षेबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.

हा उपक्रम क्विक हील फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर येथील विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत डिजिटल सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण माहिती आत्मसात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!