देशव्यापी कँडल मार्चला सावद्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

रावेर तालुक्यातील सावदा येथे CJP च्या वतीने आयोजित देशव्यापी कँडल मार्चमध्ये विद्यार्थी, युवक, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत पोलीस अत्याचारग्रस्तांना न्याय, संविधानाचे संरक्षण, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते बसस्थानक असा कँडल मार्च काढत सावद्यात नागरिकांनी अन्यायाविरोधात एकजुटीचा संदेश दिला. CJP च्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद.

तालुका रावेर येथील सावदा गावात देशभरातील पोलीस अत्याचारग्रस्तांना न्याय मिळावा आणि संविधान, मानवता व एकजुटीचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा या उद्देशाने CJP यांच्या वतीने रविवारी दि. २६ जुलै सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी कँडल मार्चला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कँडल मार्चची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, सावदा येथून झाली. विद्यार्थी, युवक, महिला, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने हातात मेणबत्त्या घेऊन शांततेत मार्चमध्ये सहभागी झाले. त्यानंतर हा मार्च शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, बस स्टँड, सावदा येथे पोहोचला.

यावेळी सहभागी नागरिकांनी अन्यायाविरोधात आवाज बुलंद करत न्याय, संविधान, मानवता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश दिला. संपूर्ण मार्च शांततापूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी अन्यायग्रस्तांच्या पाठीशी समाजाने एकजुटीने उभे राहण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांनी सर्व सहभागी नागरिक, विद्यार्थी, युवक, सामाजिक संघटना आणि सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!