सामाजिक क्रांतीच्या दिशेने पाऊल! जळगाव जिल्ह्यातील उचंदे येथे २५ मे रोजी बौद्ध धम्मिय सामूहिक विवाह सोहळा संपन्न होणार.
मुक्ताईनगर (जळगाव): वाढत्या महागाईच्या काळात लग्नसराईतील अवाढव्य खर्च टाळून समाजातील गरीब व गरजू कुटुंबांना आधार देण्यासाठी भीमस्टार फाऊंडेशन, उचंदे (ता. मुक्ताईनगर) यांच्या वतीने भव्य बौद्ध धम्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, दिनांक २५ मे २०२६ रोजी उचंदे येथे संपन्न होणार आहे.
सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक बचतीचा उद्देश समाजातील आर्थिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्रांतीमुळे आपण प्रगती करत असलो, तरी इतर समाजाच्या तुलनेत सामूहिक विवाह सोहळ्यांचे प्रमाण आपल्याकडे कमी आहे. अनेक कुटुंबे मुला-मुलींच्या लग्नासाठी कर्ज काढून कर्जबाजारी होतात. हीच अडचण ओळखून, वेळ आणि पैशांची बचत व्हावी तसेच शासनाच्या ‘कन्यादान योजने’ अंतर्गत मिळणारे ₹२५,००० चे अनुदान नवदाम्पत्यांना मिळावे, या उदात्त हेतूने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नोंदणी सुरू या सोहळ्यासाठी विवाह नोंदणी प्रक्रिया सध्या सुरू आहे. परिसरातील बौद्ध बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
आयोजक व मार्गदर्शक हा सोहळा भीमस्टार फाऊंडेशनचे अध्यक्ष आयु. दिपक इंगळे (पत्रकार) आणि संस्थेचे प्रेरणास्थान आयु. दादासाहेब एन. जी. शेजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. तसेच उचंदे, नांदवेल, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर यांसह परिसरातील अनेक कार्यकर्त्यांचे या कार्यासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे.
संपर्क: नोंदणीसाठी इच्छुकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:
- ९७६६११८८६२
- ९७६४९१९४५१
- ७५५९११३२३२
- ९८९०६२५७०७
- ९५४५९५९९५४

सतीश वाणखेडे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या तसेच जाहिराती देण्याकरिता आपण यांना संपर्क करू शकतात.
मो. क्र. ८०८०९८०५०७
ईमेल- satish02031997@gmail.com
