धुळे जिल्ह्यातील आर्वी येथील रोकडे हनुमान मंदिराच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; रुबाब पिंजारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.
आग्रा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थान परिसरातील सर्विस रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रुबाब पिंजारी यांनी पुढाकार घेतला आहे.
मंदिर परिसरातील सर्विस रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याने मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसह स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वाहतूक, ये-जा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर बनला असून, संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
या प्रश्नाच्या तातडीच्या सोडवणुकीसाठी रुबाब पिंजारी यांनी आज (दि. २५ ऑगस्ट २०२६) मुंबई येथील देवगिरी निवासस्थानी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा. ना. सुनेत्रा ताई पवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी रोकडे हनुमान मंदिर देवस्थानच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून भाविक व नागरिकांची गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात आली.
सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक निर्देश देऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी विनंती रुबाब पिंजारी यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली.
“भाविक आणि स्थानिक नागरिकांची गैरसोय लक्षात घेता रोकडे हनुमान मंदिर परिसरातील सर्विस रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे. या प्रश्नासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील,” अशी भूमिका रुबाब पिंजारी यांनी व्यक्त केली.
मागणी : श्री क्षेत्र रोकडे हनुमान मंदिर देवस्थानच्या सर्विस रस्त्याचे उर्वरित अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्यात यावे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
