“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून सेंट मेरी इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली.
वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षा आणि सुरक्षित ऑनलाइन व्यवहाराबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सेंट मेरी इंग्लिश स्कूल, लातूर येथे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी तसेच सोशल मीडियाचा सुरक्षित आणि जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही शेअर करू नये, अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये. तसेच संशयास्पद फोन कॉल, संदेश आणि आकर्षक ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे, नरेश पंडित, आयुष जोशी, श्रेयस माकणे आणि प्राची भोसले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सायबर सुरक्षा आणि ऑनलाइन फसवणुकीशी संबंधित विविध प्रश्न विचारले.
“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा महत्त्वपूर्ण संदेश या जनजागृती उपक्रमातून विद्यार्थ्यांना देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
