आरसीसी क्लासेस, लातूर येथे सायबर जनजागृती

लातूर येथील आरसीसी क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली.

“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून विद्यार्थ्यांना अनोळखी लिंकपासून सावध राहण्याचे, वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आणि सुरक्षित डिजिटल व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले.

लातूर : क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत आरसीसी क्लासेस, लातूर येथे विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फ्रॉड, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, ओटीपी व पासवर्ड कोणालाही देऊ नये तसेच संशयास्पद फोन कॉल आणि संदेशांपासून सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि नरेश पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले. डिजिटल व्यवहार करताना वैयक्तिक आणि बँकिंग माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!