कॉस्मॉस स्पोकन इंग्लिशमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; तुषार वाघमारे यांचा सत्कार

लातूर येथील कॉस्मॉस स्पोकन इंग्लिशमध्ये क्विक हील फाऊंडेशनच्या वतीने आयोजित सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांना डिजिटल फसवणुकीपासून बचावाचे मार्गदर्शन; तुषार वाघमारे यांचा सत्कार.

कॉस्मॉस स्पोकन इंग्लिशमध्ये सायबर सुरक्षा जनजागृती; तुषार वाघमारे यांचा सत्कार

विद्यार्थ्यांना ओटीपी फसवणूक, फेक जॉब इंटरव्ह्यू आणि डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे मार्गदर्शन

लातूर : क्विक हील फाऊंडेशनच्या वतीने कॉस्मॉस स्पोकन इंग्लिश, लातूर येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी तुषार वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करत ओटीपी फसवणूक, ऑनलाइन फेक जॉब इंटरव्ह्यू तसेच विविध डिजिटल फसवणुकींच्या प्रकारांबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

सायबर सुरक्षा हा आजच्या डिजिटल युगातील अत्यंत गरजेचा विषय असून, अशा जनजागृती उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन जगात सुरक्षित आणि सतर्क राहण्यासाठी मोठा फायदा होत असल्याचे उपस्थितांनी सांगितले. विद्यार्थ्यांनीही सत्राला उत्स्फूर्त प्रतिसाद देत सायबर सुरक्षेशी संबंधित विविध प्रश्न विचारले.

यावेळी अजय मुस्के पाटील सर यांच्या हस्ते तुषार वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला. सायबर सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या विषयावर जनजागृती केल्याबद्दल त्यांचे कौतुक करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच साहिल जाधव आणि आदित्य माने यांचाही सत्कार करण्यात आला. सायबर सुरक्षा जनजागृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या त्यांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाला क्विक हील फाऊंडेशनच्या टीमचे सदस्य उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित हा उपक्रम उत्स्फूर्त वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!