किड्स इन्फो पार्क स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे मार्गदर्शन

लातूर येथील किड्स इन्फो पार्क इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुमारे ४५० ते ५०० विद्यार्थ्यांसाठी क्विक हील फाउंडेशनच्या वतीने सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. लाईव्ह हॅकिंग डेमो, फोटो मॉर्फिंग, व्हॉइस क्लोनिंग आणि सोशल मीडिया सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

किड्स इन्फो पार्क स्कूलमधील विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. शाळेच्या प्राचार्यांनी उपक्रमाचे कौतुक करत टीमला शुभेच्छा दिल्या.

 वाढत्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर क्विक हील फाउंडेशनच्या वतीने किड्स इन्फो पार्क इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शाळेतील तीन ते चार वर्गांमध्ये स्वतंत्रपणे संवाद साधत सुमारे ४५० ते ५०० विद्यार्थ्यांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचवण्यात आला.

यावेळी तुषार वाघमारे, साहिल जाधव आणि आदित्य माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या डिजिटल वापराच्या सवयी आणि मत जाणून घेतले. विद्यार्थ्यांना डिजिटल सेफ्टी कशी राखावी, ऑनलाइन जगात कोणती काळजी घ्यावी तसेच छोट्या डिजिटल चुका मोठ्या समस्यांमध्ये रूपांतरित होऊ नयेत यासाठी कोणत्या खबरदारी घ्याव्यात, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमात लाईव्ह हॅकिंग डेमोच्या माध्यमातून सायबर हल्ले कोणत्या प्रकारे होऊ शकतात, याचे प्रात्यक्षिक समजावून सांगण्यात आले. तसेच ऑनलाइन फोटो मॉर्फिंग, व्हॉइस क्लोनिंग आणि सोशल मीडिया सुरक्षेसह विविध सायबर धोक्यांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

यावेळी क्विक हील फाउंडेशनच्या टीममधील साहिल जाधव, आदित्य माने, नम्रता तोर, नेहल बुलानी आणि परमेश्वर पांढरे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारत संवाद साधला.

शाळेच्या प्राचार्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत टीमच्या सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. तसेच सकारात्मक फीडबॅक देत टीमला पुढील सायबर सुरक्षा जनजागृतीच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!