नळेगावातील मंदिरात सायबर जनजागृती; नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी आणि फिशिंगपासून सावध राहण्याचे आवाहन

नळेगावातील मंदिर परिसरात नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, ओटीपी, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल आणि सुरक्षित डिजिटल व्यवहाराबाबत सायबर सुरक्षा जनजागृती करण्यात आली.

सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि आयुष जोशी यांनी नळेगावातील नागरिकांशी संवाद साधत ओटीपी, पासवर्ड आणि वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन केले.

 वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नळेगावातील मंदिर परिसरात नागरिकांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम घेण्यात आला. यावेळी ऑनलाइन फसवणूक, ओटीपी फसवणूक, फिशिंग लिंक, बनावट फोन कॉल, सोशल मीडिया फसवणूक तसेच डिजिटल व्यवहारातील सुरक्षिततेबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

डिजिटल व्यवहार करताना ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, तसेच अनोळखी किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले. संशयास्पद फोन कॉल आणि संदेशांपासून सावध राहण्याबाबतही नागरिकांना माहिती देण्यात आली.

क्विक हील फाउंडेशन, महाराष्ट्र सायबर आणि राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि आयुष जोशी यांनी नागरिकांशी संवाद साधत सायबर फसवणुकीपासून बचावासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन केले.

“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश यावेळी देण्यात आला. डिजिटल व्यवहार करताना सजग राहून वैयक्तिक व आर्थिक माहिती सुरक्षित ठेवण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!