अमळनेरमध्ये महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित निबंध व वक्तृत्व स्पर्धा; 12 एप्रिल रोजी आयोजन, आकर्षक बक्षिसे जाहीर.
अमळनेर शहरात सामाजिक आणि शैक्षणिक जाणीवा वाढविण्यासाठी भव्य निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित विषय ठेवण्यात आले असून, नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक तसेच सर्वसामान्य नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात. वक्तृत्व स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला ८ मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे, तर निबंध स्पर्धेसाठी ८०० ते १००० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी आकारण्यात येणार नाही. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ₹1000, ₹750 आणि ₹500 अशी बक्षिसे तसेच प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.
वक्तृत्व स्पर्धा दि. 12 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9 वाजता विठ्ठल नगर, अमळनेर येथे प्रा. अशोक पवार यांच्या निवासस्थानी (अभ्यासिका) आयोजित करण्यात आली आहे. तसेच निबंध स्पर्धेसाठी इच्छुकांनी आपले निबंध दि. 10 एप्रिल 2026 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील संयोजकांशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे:
- प्रा. अशोक पवार – 9422278256
- श्री हृदयनाथ मोरे – 9421512085
- प्रा. राहुल निकम – 9823222659
- श्री बापूराव ठाकरे – 9960209825
या स्पर्धेमुळे महान समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार होऊन युवकांमध्ये जागरूकता वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
