जळगाव जिल्हा परिषदेत कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची बैठक; कर्मचारी समस्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, जिल्हा जळगावच्या शिष्टमंडळाने नुकतीच भेट घेत विविध संघटनात्मक विषयांसह कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या अडचणी, प्रशासनाशी संबंधित विषय तसेच विविध मागण्यांकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले.
बैठकीदरम्यान कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या प्रलंबित बैठकीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी सकारात्मक भूमिका घेत महासंघाची बैठक लवकरच आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचारी हिताच्या प्रश्नांवर प्रशासनाने संवेदनशीलतेने लक्ष द्यावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
या प्रसंगी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बापू साळुंके, महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष योगेश अडकमोल, शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष नितीन सोनवणे, तालुका सचिव राहुल मोरे, डी.एच. भास्कर, गोपीचंद भालेराव, सावखेडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत कर्मचारी वर्गाच्या विविध प्रशासकीय अडचणी, सेवाविषयक प्रश्न तसेच संघटनात्मक बाबींवर सकारात्मक चर्चा झाल्याचे शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
