अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त जळगावात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले.
कार्यक्रमात ज्योती राणे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या आदर्श नेतृत्वाची माहिती दिली. नूतन तासखेडकर व आशा मौर्य यांनीही त्यांच्या सामाजिक, धार्मिक व लोककल्याणकारी कार्याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अहिल्यादेवी होळकर यांनी आपले संपूर्ण जीवन रयतेच्या कल्याणासाठी समर्पित केले असून त्यांनी उभारलेली मंदिरे, घाट व धर्मशाळा आजही त्यांच्या महान कार्याची साक्ष देत असल्याचे वक्त्यांनी सांगितले.
याप्रसंगी किमया पाटील, हर्षा गुजराती, माधुरी शिंपी, अस्मिता सरवैया आदी उपस्थित होत्या. अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श समोर ठेवून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे न्यावे, असे मत माधुरी शिंपी व हर्षा गुजराती यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे वातावरण प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते. उपस्थितांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांचे अनुसरण करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
