१९ जून रोजी जिल्हा पेंशन,पीएफ कार्यशाळेचे आयोजन: निवृत्तीवेतनधारकांच्या तक्रारींवर होणार थेट मार्गदर्शन

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथील नियोजन सभागृहात १९ जून रोजी आयोजित जिल्हा पेंशन व पीएफ कार्यशाळेत महालेखाकार कार्यालय, महाराष्ट्र-१, मुंबई येथील अधिकारी निवृत्तीवेतनधारकांच्या अडचणी व तक्रारींचे प्रत्यक्ष निराकरण करणार आहेत. जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

निवृत्तीवेतन आणि पीएफ संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी जळगावात १९ जून रोजी विशेष कार्यशाळा; निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन.

 महाराष्ट्र शासनातील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन (पेन्शन) व भविष्य निर्वाह निधी (पीएफ) संदर्भातील अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा पेंशन/पीएफ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा दि. १९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृह येथे होणार आहे. या कार्यशाळेत महालेखाकार कार्यालय (लेखा व हक्क), महाराष्ट्र-१, मुंबई येथील चार अधिकारी उपस्थित राहून निवृत्तीवेतनधारकांच्या समस्या व शंका यांचे प्रत्यक्ष निराकरण करणार आहेत.

जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या कार्यशाळेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या निवृत्तीवेतन व पीएफसंबंधी अडचणींचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिचयातील इतर निवृत्तीवेतनधारकांनाही या उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही सांगण्यात आले आहे.

या संदर्भात माहिती देताना जिल्हा कोषागार अधिकारी माधव थैल यांनी ही कार्यशाळा निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!