खडकवासला मतदारसंघातील फ्लिपकार्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना यश. वंचित बहुजन युवा आघाडीच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर व्यवस्थापनाने भत्ता पुनर्निर्धारणासह विविध मागण्या मान्य केल्या.
वंचित बहुजन युवा आघाडीच्या ठोस पाठपुराव्यामुळे फ्लिपकार्ट डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पेट्रोल दरवाढीनुसार भत्त्याचे नियमित पुनर्निर्धारण करावे, या प्रमुख मागणीसाठी आवाज उठवणाऱ्या फ्लिपकार्टच्या १७ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आयडी अचानक बंद करण्यात आल्या होत्या. वारंवार विचारणा करूनही त्यांची आयडी पुन्हा सुरू करण्यात येत नव्हती, अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी वंचित बहुजन युवा आघाडी, खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे आणि महासचिव गौतम तायडे यांच्याकडे दाद मागितली. त्यानंतर शिष्टमंडळाने नांदेड सिटी येथील फ्लिपकार्ट स्टोअरला भेट देत व्यवस्थापनाशी चर्चा केली.
चर्चेदरम्यान वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर व्यवस्थापनाने तातडीने १७ डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या आयडी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या.
या यशस्वी आंदोलनात वंचित बहुजन युवा आघाडीचे अध्यक्ष राजेंद्र कांबळे, उपाध्यक्ष अमोल बावस्कर, उपाध्यक्ष आनंद ढेंबरे, महासचिव गौतम तायडे, विकी खंडागळे तसेच मोठ्या संख्येने डिलिव्हरी कर्मचारी उपस्थित होते.
या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून संघटनेच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
