वसईजवळील मुंबई-वडोदरा महामार्गावर मोटारसायकल घसरून झालेल्या भीषण अपघातात २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर आकाश निर्जयसिंग ठाकूर यांचा मृत्यू झाला. मांडवी पोलीस पुढील तपास करत आहेत.
नियोजित मुंबई-वडोदरा महामार्गावर मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात २२ वर्षीय सिव्हिल इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आकाश निर्जयसिंग ठाकूर (वय २२) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आकाश ठाकूर हा पालघर जिल्ह्यातील मानपाडा – खारेकुरण परिसरातील रहिवासी असून तो व्यवसायाने सिव्हिल इंजिनिअर होता. शनिवारी रात्री तो होंडा शाईन मोटारसायकलने मुंबई-वडोदरा महामार्गावरून प्रवास करत असताना डोलीव गावच्या हद्दीत खार्डी ब्रिजजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल घसरून भीषण अपघात घडला.
अपघातात आकाशच्या डोक्याला आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत त्याला रुग्णवाहिकेद्वारे ‘गॅलेक्सी हॉस्पिटल’ येथे दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.
या घटनेनंतर मांडवी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
