अपघातग्रस्त, गंभीर आजारी तसेच थॅलेसिमिया, हिमोफिलिया आणि सिकलसेल रुग्णांसाठी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित; जळगावमध्ये स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष उपक्रम.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी आपल्या प्राणांची आहुती देत बलिदान दिले. या अमर हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी (रक्तकेंद्र) आणि मुक्ती फाउंडेशनतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त रक्तदानाचा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार, १५ ऑगस्ट रोजी सकाळी सव्वा आठ वाजता रेडक्रॉस भवन येथे शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत स्वयंस्फूर्तीने रक्तदान करणार आहेत. रक्तदानाच्या माध्यमातून हुतात्म्यांना विनम्र आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शहरासह जिल्ह्यातील सामाजिक व सेवाभावी संस्था, विविध प्रतिष्ठाने, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रक्तदानाच्या सेवेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांची आठवण जपत वर्षभर रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अपघातग्रस्त, गंभीर आजारी रुग्णांसह थॅलेसिमिया, हिमोफिलिया, सिकलसेल आणि रक्तक्षयाने त्रस्त रुग्णांना रक्ताची कायम गरज असते. अशा रुग्णांना रक्तदानातून जीवनदान देण्याच्या पवित्र कार्यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शतकवीर रक्तदाता मुकुंद गोसावी, इंडियन रेडक्रॉस सोसायटी आणि मुक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
हुतात्म्यांना खरी आदरांजली म्हणजे रक्तदानातून एखाद्याचे प्राण वाचवणे, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
