भानुदास बढे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यगौरव पुरस्कार ;जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांचाही विशेष गुणगौरव

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी भानुदास मारोती बढे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

मुक्ताईनगरच्या जी. जी. खडसे महाविद्यालयाचा गौरव; शिक्षकेत्तर कर्मचारी भानुदास बढे यांना विद्यापीठाचा उत्कृष्ट कर्मचारी कार्यगौरव पुरस्कार प्रदान.

श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. भानुदास मारोती बढे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता आणि सेवाभावाची दखल घेत विद्यापीठाच्या वतीने हा सन्मान करण्यात आला.

हा पुरस्कार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश वा. गोसावी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. विजय एल. माहेश्वरी यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. भानुदास बढे यांनी महाविद्यालयातील आपल्या सेवाकाळात कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता आणि सेवाभाव जपत संस्थेच्या कामकाजात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कार्याची विद्यापीठीय स्तरावर दखल घेत मिळालेला हा पुरस्कार महाविद्यालयासाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.

प्राचार्य डॉ. हेमंत महाजन यांचाही विशेष गुणगौरव

याच गौरव सोहळ्यात श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. हेमंत महाजन यांचाही विशेष गुणगौरव करण्यात आला. त्यामुळे या सोहळ्याच्या निमित्ताने महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याला विद्यापीठीय स्तरावर विशेष अधोरेखित करण्यात आले.

संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन

श्री. भानुदास बढे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा. आमदार एकनाथरावजी खडसे, चेअरमन ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर, व्हा. चेअरमन मा. नारायणदादा चौधरी, सचिव डॉ. सी. एस. चौधरी तसेच समस्त संचालक मंडळाने त्यांचे अभिनंदन केले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे, उपप्राचार्य डॉ. वंदना चौधरी, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनीही श्री. बढे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कार्याची विद्यापीठीय पातळीवर दखल घेत मिळालेला हा सन्मान महाविद्यालयातील इतर कर्मचाऱ्यांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे. श्री. भानुदास बढे यांच्या या गौरवामुळे श्रीमती जी. जी. खडसे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!