अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्ह्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरणे, प्रलंबित तपास आणि पीडितांच्या अर्थसहाय्याचा आढावा घेण्यात आला.

जळगाव जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे, तपासाची सद्यस्थिती, पीडितांचे अर्थसहाय्य आणि सामाजिक विकास योजनांचा आढावा.

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल गुन्ह्यांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची मासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात घेण्यात आली.

बैठकीत जुलै २०२६ मध्ये नव्याने दाखल झालेले तसेच पोलीस तपासावर प्रलंबित असलेले गुन्हे आणि जुलैअखेर तपासासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. संबंधित प्रकरणांमध्ये तपासाची सद्यस्थिती आणि पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली.

अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत दाखल गुन्ह्यांतील पीडितांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्या वेळेस उपस्थित झालेल्या विषयांवरही चर्चा करण्यात आली.

समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी समितीच्या कामकाजाबाबत माहिती दिली. बैठकीला संबंधित विभागांचे अधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!