खरीप हंगामाच्या तोंडावर नंदुरबार जिल्ह्यात डिझेलटंचाई गंभीर बनली आहे. शेतकऱ्यांना ड्रम घेऊन पंपांवर रांगा लावाव्या लागत असून शेतमशागतीला ब्रेक लागला आहे.
शनिमांडळ नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ परिसरातील शेतकऱ्यांना सध्या शेतमशागतीच्या कामांना ब्रेक द्यावा लागत आहे. शेतमशागत करणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये टाकण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आगामी नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
नंदुरबार तालुक्यात शेतकरी येत्या खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. कापूस व सोयाबीनसह विविध पिकांच्या पेरणीसाठी शेत तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेतमशागत
करण्यावर भर देत आहेत. परंतु, ट्रॅक्टरसाठी लागणारे डिझेल मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. डिझेलअभावी ट्रॅक्टर पंपापर्यंत घेऊन जाणे शक्य नसल्याने शेतकऱ्यांना ड्रम घेऊन पंपांवर जावे लागत आहेत. शेतकरी नंदुरबार शहर व परिसरातील पंपांवर तासनतास थांबूनही डिझेल मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मजुरांवरही परिणाम
डिझेलअभावी ट्रॅक्टर बंद पडले असल्याने मजूरांचेही नुकसान होत आहे. मजूराच ट्रॅक्टरसोबत मजूरीसाठी जाणाऱ्या युवकांचा रोजगार बुडत आहे. शेणखत किंवा गाळ वाहून नेण्याची कामे बंद आहेत. यातून युवक घरीच बसून आहेत. ही कामे सुरु झाल्यास त्यांचा रोजगार मिळेल, परंतू डिझेलच नसल्याने समस्या वाढत आहेत.

चेतन निकुंभे हे शनिमांडळ, नंदुरबार येथील वीर भगतसिंग अभ्यासिकेचे सदस्य तसेच शनि बजरंग सेवाभावी संस्था शनिमांडळ चे अध्यक्ष असुन ते एक शिक्षक, वक्ते आणि लेखक असुन ते समाजकार्यात कार्यरत असतात. चेतन निकुंभे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.
Email- sbsevabhavi54@gmail.co
Mobile -+91 99233 28654
