भुसावळमध्ये प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला; चिराग हॉल परिसरात चाकू व सळईने हल्ल्याची घटना पाच जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळच्या चिराग हॉल परिसरात प्रेमविवाहाच्या वादातून तरुणावर चाकू व लोखंडी सळईने हल्ला; पाच जणांविरुद्ध बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल.

प्रेमविवाहाच्या वादातून भुसावळमध्ये ओला कॅब चालकावर चाकू आणि सळईने हल्ला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.

प्रेमविवाहाच्या रागातून तरुणावर चाकू व लोखंडी सळईने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना शहरातील चिराग हॉल परिसरात घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २० मे रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजता घडली. फिर्यादी आवेश शेख बिस्मिल्ला (वय २५, व्यवसाय ओला कॅब चालक, मूळ रा. भुसावळ, सध्या पनवेल, मुंबई) याने आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपी फकीरा तडवी, जाहिद तडवी, शाहिद तडवी, आवेश तडवी आणि फैजान तडवी (सर्व रा. आयान कॉलनी, भुसावळ) यांनी “भुसावळमध्ये कसा आलास, तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी काही आरोपींनी चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादीने तो वार हाताने अडवल्याने त्याच्या हाताला व छातीला दुखापत झाली.

दरम्यान, पीडिताच्या मदतीला आलेल्या त्याच्या मोठ्या भावालाही मारहाण करण्यात आली असून एका आरोपीने लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर वार केल्याने तोही जखमी झाला आहे.

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!