जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २८ विद्यार्थ्यांना विविध उद्योगसंस्थांमध्ये नोकरीची संधी; विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव.
जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षामार्फत रसायनशास्त्र प्रशाळेतील विद्यार्थ्यांसाठी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड प्रक्रियेत एकूण २८ विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नियुक्तीची संधी मिळाली आहे.
या परिसर मुलाखतीत साय एज अॅब्स्ट्रॅक्ट्स, पुणे, सर्व्हायव्हल टेक्नॉलॉजीज प्रा. लि., न्यू एरा अॅडहेसिव्ह अॅण्ड सीलंट्स प्रा. लि., नोव्हा अॅग्री टेक प्रा. लि., सिद्धार्थ कार्बोकेम प्रा. लि., प्रिसिजन केम प्रा. लि., ठाणे तसेच एस. पी. अॅडव्हान्स्ड इंजिनिअरिंग मटेरियल्स प्रा. लि. या उद्योगसंस्थांनी सहभाग घेतला होता.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये निकिता चौधरी, साक्षी पाटील, वैष्णवी पाटील, निलेश जाधव, योगिता गोस्वामी, भावेश भामरे, तुषार शेलार, प्रणव पाटील, वैष्णवी अ. पाटील, कुणाल मराठे, भाग्यश्री कोठावदे, चेतन सूर्यवंशी, कल्पेश हिरे, सुमित पाटील, हर्षल वायंडेसकर, अक्षय सैंदाणे, समाधान सूर्यवंशी, निखील पाटील, सिमरन पाटील, रेणुका पाटील, मोहित पाटील, प्रणाली पाटील, कविता माळी, दर्शना पाटील, पंकज बोराडे, महेश पाटील, प्रणव कुलकर्णी आणि सचिन पाटील यांचा समावेश आहे.
ही संपूर्ण प्रक्रिया केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्षाचे समन्वयक प्रा. उज्ज्वल डी. पाटील, उपसमन्वयक प्रा. रामेश्वर चव्हाण आणि नियुक्ती अधिकारी सोनाली दयामा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, प्रा. दीपक दलाल, प्रा. रत्नमाला बेंद्रे, प्रा. विकास गिते तसेच समन्वयक डॉ. अमरदीप पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
