नूतन मराठा महाविद्यालयात केमटेक २०२६ कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

नूतन मराठा महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागात आयोजित ‘केमटेक २०२६’ कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक रासायनिक व विश्लेषणात्मक उपकरणांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आणि संशोधनातील उपयोगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

नूतन मराठा महाविद्यालयात ‘अ वन डे वर्कशॉप ऑन केमिकल इंस्ट्रुमेंटेशन’ कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाच्या संधींबाबत मार्गदर्शन.

नूतन मराठा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने ‘केमटेक २०२६ – अ वन डे वर्कशॉप ऑन केमिकल इंस्ट्रुमेंटेशन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयाच्या संशोधन प्रयोगशाळेत झालेल्या या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना आधुनिक रासायनिक आणि विश्लेषणात्मक उपकरणांचे थेट प्रात्यक्षिक दाखवून मार्गदर्शन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना रासायनिक उपकरणांची मूलतत्त्वे, त्यांची अचूक कार्यपद्धती आणि प्रत्यक्ष उपयोग समजावा, तसेच त्यांच्यामध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

‘बेटर रिसर्च, ब्राईड फ्युचर’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे व्यावहारिक ज्ञान देण्याबरोबरच त्यांची संशोधनक्षमता अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला.

कार्यशाळेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, उपप्राचार्य तथा रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एस. पाटील, पदव्युत्तर समन्वयक डॉ. के. बी. पाटील, डॉ. आर. बी. देशमुख, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. एन. जे. पाटील आणि प्रा. एस. एन. जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील अद्ययावत उपकरणांचे महत्त्व, त्यांचा संशोधनातील उपयोग तसेच रसायनशास्त्रातील संशोधनाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी रसायनशास्त्र विभागातील प्रा. यज्ञेश बावस्कर, प्रा. कमरीन शेख, प्रा. सौरभ कचरे, प्रा. कामिनी पाटील आणि प्रा. साक्षी धाडे यांनी परिश्रम घेतले.

कार्यशाळेत प्रगत प्रयोगशाळा उपकरणांचे तांत्रिक आणि व्यावहारिक प्रशिक्षण मिळाल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. आधुनिक तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष ओळख करून देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!