‘गेम खेळताना मजा करा, मात्र डिजिटल सुरक्षिततेशी तडजोड करू नका’ या संदेशातून शांतीनिकेतन शाळेत विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती.
शांतीनिकेतन इंग्लिश मीडियम शाळेत Quick Heal Foundationच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृष्णा पांडुरे यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रत्यक्ष लाईव्ह हॅकिंगचे प्रात्यक्षिक सादर करून डिजिटल जगातील विविध धोक्यांची माहिती दिली.
विशेषतः ऑनलाइन गेमिंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक, बनावट लिंक, अनोळखी व्यक्तींशी ऑनलाइन संपर्क, वैयक्तिक माहिती शेअर करणे आणि गेमिंगच्या नावाखाली होणारे आर्थिक नुकसान याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
लाईव्ह डेमोच्या माध्यमातून सायबर हल्ले आणि ऑनलाइन फसवणुकीच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या. डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी, अनोळखी व्यक्तींकडून आलेल्या लिंक किंवा संदेशांवर विश्वास का ठेवू नये आणि वैयक्तिक माहितीची गोपनीयता कशी जपावी, याबाबतही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
‘गेम खेळताना मजा करा, मात्र डिजिटल सुरक्षिततेशी तडजोड करू नका,’ असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता आणि डिजिटल जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
