“माझा डेटा, माझी जबाबदारी” या संदेशातून लातूरमध्ये सुरक्षित डिजिटल व्यवहार आणि सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.

पोस्ट ऑफिस, लातूर येथे सायबर वॉरियर्सकडून कर्मचारी व नागरिकांना ऑनलाइन फसवणूक, डिजिटल व्यवहार आणि सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन.

पोस्ट ऑफिस, लातूर येथे सायबर सुरक्षेचा जागर

ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी कर्मचारी व नागरिकांना मार्गदर्शन

लातूर : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्ट ऑफिस, लातूर येथे सायबर सुरक्षा जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आला. यावेळी पोस्ट ऑफिसमधील कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना ऑनलाइन फसवणुकीचे विविध प्रकार, डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

सायबर वॉरियर्सनी ओटीपी, पासवर्ड, बँक खात्याची माहिती तसेच वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, तसेच संशयास्पद फोन, संदेश आणि ऑनलाइन ऑफर्सपासून सावध राहावे, असे आवाहन केले.

या जनजागृती उपक्रमात सायबर वॉरियर्स अविष्कार कांबळे आणि श्रेयश माकणे यांनी सहभाग घेत कर्मचारी व नागरिकांशी संवाद साधला. डिजिटल व्यवहार करताना सतर्कता, माहितीची गोपनीयता आणि सुरक्षित ऑनलाइन सवयी यांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

“माझा डेटा, माझी जबाबदारी; सुरक्षित डिजिटल व्यवहार हीच काळाची गरज,” असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!