राजर्षी शाहू महाविद्यालयाचा Cyber Club, सायबर पोलीस विभाग आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगावमध्ये सायबर जनजागृती उपक्रम.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या सायबर धोक्यांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या Cyber Club, सायबर पोलीस विभाग आणि Quick Heal Foundation यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ या जनजागृती अभियानांतर्गत नांदगाव येथील मुकुंदराज विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात अविष्कार कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत डिजिटल जगात वैयक्तिक माहितीचे संरक्षण किती महत्त्वाचे आहे, याबाबत मार्गदर्शन केले. “माझा डेटा, ही माझी जबाबदारी आहे” हा महत्त्वपूर्ण संदेश देत विद्यार्थ्यांनी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करताना सतर्क व जबाबदार राहण्याचे आवाहन करण्यात आले.
ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन
यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, OTP, संशयास्पद लिंक, फिशिंग, सोशल मीडिया सुरक्षितता आणि वैयक्तिक माहितीची गोपनीयता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
अनोळखी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी तिची खात्री करणे, OTP किंवा पासवर्ड कोणासोबतही शेअर न करणे, संशयास्पद संदेश व लिंकपासून सावध राहणे तसेच सोशल मीडिया खात्यांची गोपनीयता जपणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.
सायबर सुरक्षिततेसाठी संयुक्त प्रयत्न
Cyber Clubच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध शैक्षणिक आणि जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. सायबर पोलीस विभागाच्या मार्गदर्शनाने आणि Quick Heal Foundationच्या सहकार्याने या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.
डिजिटल जगात तंत्रज्ञानाचा सुरक्षित आणि जबाबदार वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांना योग्य माहिती देणे ही काळाची गरज आहे. जागरूक विद्यार्थी हीच सुरक्षित डिजिटल समाजाची भक्कम पायाभरणी असल्याचा संदेश या जनजागृती कार्यक्रमातून देण्यात आला.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
