मतदार यादी दुरुस्तीच्या कामात वारंवार सूचना देऊनही टाळाटाळ आणि विलंब केल्याप्रकरणी जळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार शहरातील सात ‘बीएलओ’ (Booth Level Officers) विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (२० मार्च) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दिलेली कामे वेळेत पूर्ण न करणे यात दोषी आढळलेले कर्मचारीमध्ये महानगरपालिकेचे लिपिक, विविध शाळांचे शिक्षक आणि अंगणवाडी सेविकांचा समावेश आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना सप्टेंबर २०२५ पासून वेळोवेळी बैठका आणि व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे सूचना देण्यात आल्या होत्या, तरीही त्यांनी कामात प्रगती दाखवली नाही.
गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे
१. विकास सावळे (लिपिक, मनपा)
२. संजय रामदास सपकाळे (लिपिक, मनपा)
३. तौसीफ शेख गणी (शिक्षक, अलहिला स्कूल)
४. विमल सुपडू भारसके (अंगणवाडी सेविका)
५. रवींद्र अशोक कोळी (शिक्षक, रावसाहेब राऊत विद्यालय)
६. आरिफ खान इस्माईल खान (शिक्षक, मिल्लत स्कूल)
७. राहुल सुरेश धनगर (शिक्षक, बालविश्व विद्यालय)
जिल्हाधिकाऱ्यांचा कठोर पवित्रा-
निवडणूक कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी ५ आणि १७ मार्च रोजी बैठका घेतल्या होत्या. ज्या बीएलओंनी ॲपमध्ये मॅपिंग करणे, अस्पष्ट फोटो दुरुस्त करणे आणि दुबार नोंदी शोधण्याचे काम केले नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. त्यानुसार, तहसीलदार शीतल राजपूत यांच्या सूचनेवरून नायब तहसीलदार नवीनचंद्र भावसार यांनी फिर्याद दाखल केली आहे. जळगाव शहरात एकूण ३५८ बीएलओंची नेमणूक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे निवडणूक कामात दिरंगाई करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
