मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात सुरू असलेल्या अवैध गुटखा वाहतुकीवर मुक्ताईनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २६ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९ वाजता मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा ते सुकळी गावादरम्यान राशा बर्डाजवळील सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. या वेळी अनिकेत शिवाजी सुरवसे (वय ३५, रा. सावरगाव पोस्ट नारी, ता. बार्शी, जि. सोलापूर) याच्या ताब्यातील वाहनाची तपासणी केली असता २ लाख ४३ हजार ३६० रुपयांचा केसरयुक्त विमल पानमसाला व V-१ तंबाखू गुटखा साठा आढळून आला.
याशिवाय, संबंधित आरोपीकडून MH-14/DX-1463 क्रमांकाचे सुमारे ४ लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन तसेच ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला. एकूण मिळून ६ लाख ४८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या देखरेखीखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ, उपनिरीक्षक निलेश गोसावी तसेच पोलीस कर्मचारी भाऊराव घेटे, असिम तडवी, प्रशांत चौधरी व जवाहर पवार यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी योगराज सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच कारवाईदरम्यान महसूल विभागाचे कर्मचारी किरण बावस्कर व कृष्णा माळी उपस्थित होते.
जिल्ह्यातील अवैध गुटखा वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांकडून अशाच कठोर कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
#muktainagar #sthaniksamachar

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
