शनिमांडळ येथे फुले-आंबेडकर जयंतीनिमित्त सामान्य ज्ञान परीक्षेचे यशस्वी आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग.
महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वीर भगतसिंग अभ्यासिका व शनि बजरंग सेवाभावी संस्था, शनिमांडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 14 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान परीक्षेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या परीक्षेत परिसरातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञानाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा परीक्षांची तयारी लहानपणापासून सुरू व्हावी तसेच शिक्षणाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबद्दल उत्साह निर्माण झाला असून त्यांच्या बौद्धिक विकासास चालना मिळाली आहे.पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वीर भगतसिंग अभ्यासिकेचे पदाधिकारी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले महेंद्र पाटील,विशाल पाटील, हितेश माळी, रामेश्वर पाटील,महेश माळी व सनी कोळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी शनि बजरंग सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.चेतन निकुंभे सर यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण व्हावी यासाठी भविष्यातही अशा विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.”
या उपक्रमामुळे परिसरात शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
