फार्मर आयडीशिवाय मिळणार नाही कृषी योजनांचा लाभ; वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी मोफत नोंदणी मोहीम सुरू, कृषी विभागाचे आवाहन.
जळगाव : राज्यात डिजिटल कृषी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ॲग्रीस्टॅक (AgriStack) योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वनपट्टा धारक शेतकऱ्यांसाठी विशेष ‘फार्मर आयडी’ नोंदणी मोहीम राबविण्यात येत आहे.
वनहक्क अधिनियम, २००६ अंतर्गत अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी समुदायांना त्यांच्या वनजमिनीवरील हक्क प्रदान करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी फार्मर आयडी नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.
वनपट्टा धारक शेतकऱ्यांनी आपल्या जवळील नागरी सुविधा केंद्र (CSC) येथे आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या नोंदणीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
फार्मर आयडी नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजना, अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती सहाय्य तसेच इतर डिजिटल कृषी सेवांचा लाभ सुलभपणे मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा थेट व जलद फायदा होण्यास मदत होईल, असे कृषी विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
