महिला सक्षमीकरणासाठी कार्यरत नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर झाली असून विविध पदांवर अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे.
नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेची सन 2026–28 साठी नूतन कार्यकारिणी सर्वानुमते गठीत करण्यात आली असून, पुनश्च अध्यक्षपदी मनिषा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी ज्योती राणे यांची निवड झाली आहे.
संस्थेच्या नव्या कार्यकारिणीत विविध पदांवर अनुभवी व सक्रिय सदस्यांची निवड करण्यात आली असून, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष, कार्याध्यक्ष तसेच कायदेशीर सल्लागार आणि प्रसिद्धीप्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या आहेत.
उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे
उपाध्यक्ष : वंदना मंडावरे, जयश्री महाजन, लीना पाटील, विद्या जकातदार, सहसचिव : नूतन तासखेडकर, कोषाध्यक्ष : आशा मौर्य, सहकोषाध्यक्ष : किमया पाटील, कार्याध्यक्ष : माधुरी शिंपी, नेहा जगताप, रेणुका हिंगू, हर्षा गुजराती, संगीता चौधरी, कायदेशीर सल्लागार : अॅड. सीमा जाधव, अॅड. प्रिया नारखेडे, प्रसिद्धीप्रमुख : सोनम विजया रवींद्र पाटील, राधिका पाटील, श्रावणी पाटील, तेजल वनरा, स्वागताध्यक्ष : नीलिमा नायर, स्मिता पाटील, सदस्य : शोभना मकवाना, पूर्वी शाह, अनिता चौधरी, मंगला खडके, पूजा हिंगु
संस्थेच्या माजी कार्याचा गौरव लक्षात घेता नव्या कार्यकारिणीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे. या कार्यकारिणीद्वारे भविष्यातही समाजोपयोगी उपक्रम, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक जनजागृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, सामाजिक कार्य अधिक बळकट करत विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्यावर भर दिला जाणार आहे.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
