उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील १९ शिक्षक, अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त; मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९ शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती निमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत भावपूर्ण निरोप व सन्मान देण्यात आला.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात १९ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त विशेष समारंभ आयोजित करण्यात आला. त्यांच्या योगदानाचा गौरव करून शुभेच्छा देण्यात आल्या.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दोन प्राध्यापक, पाच अधिकारी आणि बारा कर्मचारी असे एकूण १९ जण आज सेवानिवृत्त झाले. यानिमित्त विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये रसायनशास्त्र प्रशाळेतील प्रा. रत्नमाला बेंद्रे, पर्यावरण व भूशास्त्र प्रशाळेतील प्रा. संजय पाटील, संगणक केंद्रातील प्रणाली विश्लेषक भटूप्रसाद पाटील, संलग्नता विभागाचे सहायक कुलसचिव अनिल वाणी, विकास विभागाचे सहायक कुलसचिव प्रवीण चंदनकर, प्रशासन विभागातील कक्ष अधिकारी संजीव पाटील, परीक्षा गोपनीय विभागातील कक्ष अधिकारी पद्माकर कोठावदे यांचा समावेश आहे.

तसेच वरिष्ठ सहायक हिम्मतराव पाटील, संजय महाजन, विकास पाटील, कनिष्ठ सहायक सुरेश बागुल, वाल्मीक पाटील, संजीव पाटील, चंपालाल चौधरी, वायनमन अतुल पाटील, वाहनचालक अरविंद पाटील, कुशल परीचर प्रभाकर वानखेडे, बाळासाहेब पाटील आणि शिपाई सुकलाल चौधरी हे कर्मचारीही सेवानिवृत्त झाले.

या प्रसंगी कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील तसेच वित्त व लेखा अधिकारी सीए रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवानिवृत्त शिक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

समारंभाला सत्कारमूर्तींचे कुटुंबीयही उपस्थित होते. यावेळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटना, मागासवर्गीय कर्मचारी संघटना आणि उमवि पतपेढीच्या वतीनेही सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

दीर्घ काळ विद्यापीठाच्या सेवेत राहून शैक्षणिक, प्रशासकीय आणि संस्थात्मक विकासात योगदान दिलेल्या सर्व सेवानिवृत्तांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!