राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने नवापूरचे योगेश पाटील (गोलू राजपूत) यांची महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षाच्या युवक संघटनेत नवापूर येथील युवा कार्यकर्ते योगेश राजेंद्र पाटील (गोलू राजपूत ) यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी जाहीर केली असून, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे, तसेच प्रदेशाध्यक्ष मा. आ. श्री. शशिकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे.
योगेश पाटील (गोलू राजपूत) हे अनेक वर्षांपासून पक्ष संघटनेत सक्रियपणे कार्यरत असून युवकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नंदुरबार जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील युवक संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याची भावना पक्ष कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
यावेळी विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भोला सैंदाने आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष डॉ. कुणाल पाटील उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी योगेश पाटील (गोलू राजपूत ) यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीनंतर बोलताना योगेश पाटील यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीचे प्रामाणिकपणे पालन करून युवकांना पक्षाशी जोडण्याचे आणि पक्ष संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या नियुक्तीबद्दल नवापूर परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
