रावेर तालुक्यातील सावदा शहरातील सोमेश्वरनगरमध्ये मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर. नागरिकांच्या तक्रारीनंतर सावदा नगरपालिकेने संबंधित अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पाहणीसाठी पाठवले.
रावेर तालुक्यातील सावदा शहरातील सोमेश्वर नगर या नवीन वस्तीतील नागरिकांनी दिनांक ६ जुलै रोजी आपल्या भागातील पायाभूत सोयी – सुविधा तसेच आरोग्यासंबंधी तक्रार करण्यासाठी थेट सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांचे कॅबिन गाठले. जवळपास १० ते १२ वर्षांपासून सावदा बस स्टॉप च्या मागील भागात ही नवीन वस्ती वसलेली असून मागील २ वर्षांपासून सावदा नगरपालिकेच्या हद्दीत आलेली आहे. तरी या वस्तीतील नागरिकांना गरजेच्या असलेल्या पायाभूत सोयी – सुविधा देखील मिळालेल्या नसल्यामुळे त्यांनी काही महिन्यापूर्वीच सावदा नगरपालिकेला कुलूप ढोकले होते.
त्यानंतर या कॉलनी मध्ये गटारी.,स्ट्रीट लॅम्प आणि डांबरी रस्ते बनवण्यात आले. परंतु नागरिकांच्या म्हणण्यानुसार गटारीचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. ज्यामुळे गटारींमध्ये गाळ साचतो.ज्यामुळे दुर्गंधीचे आणि डासांचे प्रमाण वाढत आहे.ज्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पावसामुळे घराजवळ गवत वाढलेले असून त्यातून साप आणि विषारी जनावरे यांचा धोका वाढलेला आहे. सोबतच बनवलेले रस्ते हे निकृष्ट दर्जाचे असून त्यावर वाहने जाऊन रस्ता खराब झालेला आहे.
अशा व अनेक समस्यांविषयी सोमेश्वर नगरमधील कृणाल तायडे.,दिलीप तडवी.,संतोष तायडे., निळू चौधरी.,रितेश भारुडे.,पप्पू चौधरी तसेच राजेश चौधरी यांनी माहिती दिली.यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सचिन बह्राटे यांनीदेखील नागरिकांची बाजू समजून घेतली.
सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी तातडीने त्यावर पाऊले उचलत संबंधित अधिकारी तसेच कर्मचारी यांना थेट वस्तीमध्ये पाठवले आणि मूळ समस्या समजून त्यावर लवकरात लवकर उपायोजना करण्यात येईल असे नागरिकांना आश्वासन दिले.

कृणाल तायडे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.
मो. क्र. +91 86002 97169,
ईमेल – krunaltayade1991@gmail.com
