मुक्ताईनगर : संत मुक्ताबाई शाळेत मराठी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे आयोजित मराठी वक्तृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक, साहित्यिक आणि राष्ट्रभक्तीपर विषयांवर प्रभावी मराठीतून विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली.

 मुक्ताईनगरातील संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये मराठी भाषेचा अभिमान जागवणारी वक्तृत्व स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

मुक्ताईनगर, ११ जुलै २०२६  ला विद्याभारती शैक्षणिक मंडळ, अमरावती संचलित संत मुक्ताबाई इंग्लिश मीडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे आज ‘मराठी वक्तृत्व स्पर्धा’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य श्री. दीपक एस. पाटील सर होते. ज्येष्ठ मराठी साहित्यिक श्री. दीपध्वज कोसोदे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच पंचायत समिती मुक्ताईनगरचे श्री. दीपक संदानशिव सरदेखील उपस्थित होते.

स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सामाजिक विषय, साहित्य, पर्यावरण आणि राष्ट्रभक्ती या विविध विषयांवर ओघवत्या मराठीतून विचार मांडले. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाने आणि भाषाशैलीने उपस्थितांची मने जिंकली.

प्रमुख पाहुणे श्री. दीपध्वज कोसोदे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “मराठी भाषा ही आपली अस्मिता आहे. वक्तृत्वामुळे विचारांची धार वाढते आणि व्यक्तिमत्व घडते. प्रत्येक विद्यार्थ्याने अधिकाधिक वाचन करून मातृभाषेचा अभिमान जपावा.”

प्राचार्य श्री. दीपक पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विषय शिक्षिका सौ. पल्लवी तिजारे, श्रीमती स्नेहा देशमुख, श्रीमती ललिता कचरे व सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!