रावेर येथे आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात हजारो नागरिकांचा मोर्चा; जय भीम, जय संविधान आणि संविधान जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात रावेर येथे समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाला हजारो भीमसैनिकांनी उपस्थित राहून आपला विरोध नोंदविला. ऑल इंडिया पँथर सेनेच्या जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही मोर्चाला उपस्थित राहून जाहीर पाठिंबा दिला.
आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर समाजामध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. मोर्चादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी संविधानिक हक्क आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली.
या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष लखन भाऊ पानपाटील, उपजिल्हाध्यक्ष अजय भाऊ शेलार, जिल्हा कार्याध्यक्ष अक्षय भाऊ वाघ, जिल्हा महासचिव आदित्य भाऊ गजरे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
तसेच रावेर तालुकाध्यक्ष विनोद भाऊ मोरे, युवा तालुकाध्यक्ष जितू इंगळे, उपाध्यक्ष श्रावण भालेराव, संघटक गणेश गाढे आणि कार्याध्यक्ष सागर ठाकरे यांनीही मोर्चात सहभाग नोंदविला.
याशिवाय मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष अतुल अटकाळे आणि सोशल मीडिया अध्यक्ष समीर गाढे यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील ऑल इंडिया पँथर सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.
मोर्चादरम्यान सहभागी कार्यकर्त्यांनी “जय भीम, जय संविधान” तसेच “संविधान जिंदाबाद” अशा घोषणा देत आपली भूमिका व्यक्त केली. आरक्षण आणि सामाजिक न्यायाच्या प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्याचा निर्धार यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
रावेर येथे झालेल्या या मोर्चामुळे आरक्षण उपवर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या प्रश्नावर विविध सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांकडून पुढील काळातही आंदोलने व जनजागृती केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
