कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि Quick Heal Foundationच्या संयुक्त विद्यमाने पारोळ्यात सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि Quick Heal Foundation, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पारोळा येथील N.E.S. Girls High Schoolमध्ये “Cyber Shiksha for Cyber Suraksha” हा सायबर सुरक्षा जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. विद्यार्थिनींमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करणे तसेच ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक सुरक्षा उपायांची माहिती देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
या जनजागृती सत्रात अक्षय पाटील आणि लोकेश पाटील यांनी विद्यार्थिनींना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. ऑनलाइन जगतात वाढत असलेल्या फसवणुकीच्या प्रकारांपासून सुरक्षित राहण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत विद्यार्थिनींना विविध उदाहरणांसह माहिती देण्यात आली.
यावेळी OTP Fraud, UPI Fraud, Banking Fraud, Phishing, Fake Job Fraud, Online Shopping Fraud, Social Media Account Hacking, Fake Profile, QR Code Fraud, Gaming Fraud आणि Cyberbullying यांसारख्या सायबर गुन्ह्यांच्या प्रकारांची माहिती देण्यात आली.
अनोळखी व्यक्तींना OTP, PIN, Password किंवा बँकिंगविषयक गोपनीय माहिती देऊ नये, संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये तसेच ऑनलाइन व्यवहार करताना सतर्क राहावे, असे मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडिया अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी मजबूत पासवर्ड आणि आवश्यक सुरक्षा पर्यायांचा वापर करण्याचेही आवाहन करण्यात आले.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे तसेच कुटुंबीयांचे संरक्षण करण्यासाठी विद्यार्थिनींनी सायबर सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न विचारून सायबर सुरक्षेबाबत अधिक माहिती जाणून घेतली.
“सावध रहा, सुरक्षित रहा आणि सायबर गुन्ह्यांना बळी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करा,” असा संदेश देत हे जनजागृती सत्र उत्साहात पार पडले.

प्रकाश खिलारे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सहसंपादक असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपण आपल्या परिसरातील बातम्या, माहिती तसेच लेख देण्याकरिता संपर्क करू शकतात…..
मो. 9112225235
Email- prakaashkhilare@gmail.com
