वरणगाव येथील विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन. विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य, स्वच्छता आणि निरोगी जीवनशैलीची शपथ देण्यात आली.
स्थानिक विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, वरणगाव येथे नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी जयंती आणि आरोग्य जनजागृती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल शिंदे हे होते. 
कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या ज्योती गुरव यांनी उपस्थितांना आरोग्याविषयी सविस्तर आणि बहुमोल मार्गदर्शन केले. त्यांनी बदलत्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी कशी घ्यावी, यावर जनजागृती केली. त्यांच्यासोबत भावना प्रजापती यांचीही प्रमुख उपस्थिती होती.या प्रसंगी गुरव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना उत्तम आरोग्य व स्वच्छते विषयी शपथ दिली
या प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक चित्ते, प्रा. राहुल जोहरे, प्रा. मनिषा इंगळे, डॉ. अनिल पाटील, प्रा. अरुणा गांगुर्डे, प्रा. संदीप शिंदे आणि प्रा. विजय पाटील आदी प्राध्यापक वर्ग सन्माननीय पाहुणे म्हणून हजर होता. 
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. हेमराज केतकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभारप्रदर्शन प्रा. रजनी इंगळे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे (रासेयो) स्वयंसेवक दीपक नगरे, वैभव नाथ, अजय मेढे यांच्यासह इतर सर्व स्वयंसेवकांनी अतोनात परिश्रम घेतले. महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी आणि कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

प्रा. राहुल जोहरे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवर लिखाण करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष लिखाणाच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात.
मो. क्र. +91 96041 53358 , इमेल – rahuljohare358@gmail.com
