भारतात जेन झी म्हणणे चुकीचे ?

जेन झीच्या जागतिक संकल्पनेपेक्षा भारतीय तरुणाईचे सामाजिक, सांस्कृतिक आणि ग्रामीण-शहरी वास्तव वेगळे; ‘भारतीय युवा’ ही संज्ञा अधिक समर्पक असल्याचा विचार.

जनरेशन झेड, भारतीय युवा आणि बदलती जीवनशैली यावर प्रा. डॉ. संजय छाया त्रिंबकराव खडक्कार यांचा विचार; ग्रामीण आणि शहरी तरुणाईतील फरकावर भाष्य.

जेन झी (जनरेशन झेड) म्हणजे १९९७ ते २०१२ या काळात जन्मलेली मुले. त्यानुसार, २०२६ मध्ये या पिढीतील मुलांचे वय १४ ते २९ वर्षांच्या दरम्यान आहे.जरी जागतिक पातळीवर या पिढीला ‘जेन झी’ म्हटले जात असले, तरी भारतात ग्रामीण आणि शहरी भागात अजूनही ‘तरुण पिढी’ किंवा ‘आजचा युवक’ हेच शब्द सर्वात जास्त लोकप्रिय आहेत.

भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशात ‘जेनझी’ हा शब्द वापरणे अनेक कारणांमुळे चुकीचे वाटते.१४ ते २९ वर्षांच्या मुलांना भारतात अधिकृतपणे किंवा समाजशास्त्रीय भाषेत “युवा” (युथ) किंवा “तरुण पिढी” म्हणतात.भारतात  सरकारी योजना आणि जनगणनेनुसार या वयोगटाला प्रामुख्याने ‘युवा’ म्हटले जाते. हिंदी आणि मराठी भाषेत तरुण मुला-मुलींसाठी नवयुवक / नवयुवती हा शब्द मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. १४ ते १९ वर्षांच्या मुलांना ‘किशोरवयीन’ (टीनएजर्स) आणि २० ते २९ वर्षांच्या लोकांना ‘युवक’ (यंग एडल्ट्स) म्हटले जाते.

भारतातील १४ ते २९ वयोगटातील सर्वच मुलांचे जीवन सारखे नाही. भारतात ग्रामीण क्षेत्रातील मुलांचे विश्व व शहरी भागातील मुलांचे विश्व पुर्णतः वेगळे आहे. या तरुणांमध्ये खुप मोठी दरी आहे.जेनझी’ हा शब्द फक्त शहरी, आधुनिक मुलांपुरताच मर्यादित वाटतो.

पाश्चात्य ‘जेनझी’ पिढीचे विचार आणि कौटुंबिक मूल्ये वेगळी आहेत. भारतात आजही या वयातील मुले कुटुंबाशी, परंपरेशी आणि संस्कृतीशी जोडलेली आहेत.त्यामुळे
भारताच्या संदर्भात या पिढीला ‘डिजिटल इंडियाची पिढी’, ‘अमृत काळातील युवा’ किंवा थेट ‘भारतीय तरुण’ म्हणणे अधिक योग्य आणि आदरयुक्त वाटते.

प्रा.डॉ.संजय छाया त्रिंबकराव खडक्कार.

माजी तज्ज्ञ सदस्य,  विदर्भ वैधानिक विकास मंडळ.

मोबाईल क्रमांक: 7276614260

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!