जळगावातील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये Duet Dance Competition उत्साहात संपन्न. आकर्षक पोशाख, उत्कृष्ट हावभाव आणि पालक-विद्यार्थ्यांच्या ताळमेळाने स्पर्धा रंगली.
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये २४ ऑगस्ट २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि रंगतदार वातावरणात ‘दुहेरी नृत्य स्पर्धे’चे (Duet Dance Competition) आयोजन करण्यात आले. विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांमधील स्नेहबंध अधिक दृढ व्हावेत तसेच पालक-विद्यार्थ्यांना एकत्रितपणे आपले कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.
स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या आई, भाऊ आणि बहिणीसोबत जोडीदाराच्या रूपात उत्स्फूर्त सहभाग घेतला. आकर्षक पोशाख, उत्साहपूर्ण नृत्यसादरीकरण, उत्कृष्ट हावभाव आणि जोडीदारांमधील अप्रतिम ताळमेळ यामुळे सहभागी स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओजस पाटील, हेरंब कोल्हे आणि श्वेता लहामगे या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आणि बहारदार शैलीत केले.
स्पर्धेसाठी प्रमुख परीक्षक म्हणून रमा करजगावकर आणि वैशाली गोरे उपस्थित होत्या. त्यांनी सर्व सहभागी स्पर्धकांच्या मेहनतीचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपली कलात्मक क्षमता सादर करण्याची संधी मिळण्याबरोबरच पालक आणि मुलांमधील भावनिक नाते अधिक दृढ झाले. नृत्य, मनोरंजन आणि कौटुंबिक स्नेहाचा सुंदर संगम या स्पर्धेत पाहायला मिळाला.
कार्यक्रम प्रमुख म्हणून सरोज जयस्वाल, अश्विनी पाटील आणि स्वाती कुलकर्णी यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण सोनवणे आणि समन्वयक अरुण पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि यशस्वीरीत्या पार पडला. पालक आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा मनापासून आनंद घेतला. मनोरंजनासोबतच कुटुंबातील आपुलकी आणि प्रेमाचा धागा अधिक घट्ट करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील.

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989, ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
