नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील यांनी जळगावकरांना झाडे लावून ती जगविण्याचे आवाहन करत पर्यावरण संतुलनाचे महत्त्व पटवून दिले.
जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था व रेड स्वस्तिक सोसायटी यांच्या वतीने हायवे आयटीआय कॉलेज समोर वृक्षारोपण करण्यात आले. झाडे लावा झाडे वाचवा असे व्रत स्वीकारलेल्या नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने पावसाच्या आगमनापूर्वी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सौ मनीषा पाटील व पदाधिकारी यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्ष मनीषा पाटील यांनी वृक्षांचे अनन्य साधारण महत्व विषद करत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी
जळगावकर नागरिकांना झाडे लावून झाडे जगवण्याचे आवाहन केले .
मानवी जिवन निसर्गावर अवलंबून असून . निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष संवर्धन अत्यावश्यक असल्याचे सांगीतले . तसेच निसर्गाच्या सानिध्यात आपले जीवनमान कसे फुलवावे यासंदर्भात उदबोधन केले . या प्रसंगी प्रामुख्याने वड, कडुलिंब, करंज, कदंब, काशीद, पिंपळ, औदुंबर ही देशी वृक्ष लावण्यात आली. थंडगार सावली ,शुद्ध हवा तसेच पर्यावरणाचे संतुलन राखण्यास अत्यंत उपयोगी असलेल्या या वृक्षांची संवर्धनाची जबाबदारी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने स्वीकारली.
याप्रसंगी नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष सौ मनिषा पाटील, वंदना मंडावरे,किमया पाटील, नूतन तासखेडकर, नेहा जगताप संतोष जगताप रेणुका हिंगू, हर्षा गुजराती, स्मिता पाटील तेजल वनरा नेहा मौर्य चेतन सोनवणे हे उपस्थित होते .

कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मिडिया चे संपादक असुन यांना पत्रकारितेचा १० वर्षाचा अनुभव आहे. कौस्तुभ शिंदे हे स्थानिक समाचार डिजिटल मीडिया चे सक्रिय योगदानकर्ता असून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि स्थानिक घडामोडींवरील बातम्यांचे वृत्तांकन करतात. जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, स्थानिक पातळीवरील महत्त्वाच्या घटनांची अचूक माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे आणि निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी जोडलेले राहणे हा त्यांच्या लेखनाचा मुख्य उद्देश आहे. डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून ते विविध विषयांवर सखोल आणि प्रभावी बातम्या प्रकाशित करतात. आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातींकरिता संपर्क करावा-
मो. क्र. +917507502989
ईमेल – sthaniksamacharbharat@gmail.com
